Best Teacher Award to Prof. Monali Panchakshari

PPA मध्ये विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका ‘प्रा. मोनाली पंचाक्षरी’ ह्या वर्षानुवर्षे असणाऱ्या ओळखीनंतर संचालिका प्रा. मोनाली पंचाक्षरी ह्यांना ५ सप्टेंबर रोजी ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने नवीन ओळख मिळाली. ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराच्या निमित्ताने PPA च्या गौरवशाली वाटचालीत अजून एका मानाच्या तुऱ्याची भर पडलीये. त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर असणारं वैयक्तिक लक्ष, नाशिकच्या कॉमर्स शिक्षण क्षेत्रात त्यांचा असणारा उल्लेखनीय वाटा त्यांना प्रगतीची अशीच नवीन शिखरे गाठण्यास नेहेमीच मदत करेल असा PPA ला विश्वास आहे. टीम PPA तर्फे प्रा. मोनाली पंचाक्षरी ह्यांचे खूप खूप अभिनंदन!